नायट्राझेपामच्या अवैध विक्रीप्रकरणी दोघांना अटक; १२.७१ किलो वजनाच्या २७ हजार गोळ्यांसह ६४ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई गुन्हे शाखा कक्ष-६च्या पथकाने नायट्राझेपाम या अंमली पदार्थाच्या गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. २७ हजार गोळ्यांसह १२.७१ किलो वजनाचा आणि ६४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुंबई ब्यूरो: अनिल सावरे
मुंबई गुन्हे शाखा कक्ष-६ची कारवाई; गोवंडी आणि मुंब्रा येथील दोघे आरोपी ताब्यात
मुंबई : प्रतिनिधी — नायट्राझेपाम या अंमली पदार्थाच्या गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना मुंबई गुन्हे शाखा, कक्ष-६च्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून Nitrazepam Tablets Button या अंमली पदार्थाच्या २७ हजार गोळ्या, एकूण १२.७१ किलो वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ६४ लाख ५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी कक्ष-६च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन इसमांना ताब्यात घेतले.
दक्षिण वाहिनी साकी नाका रोडवर, ट्रॉम्बे वाहतूक कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस, ट्रॉम्बे, मुंबई या परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईदरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर नायट्राझेपामच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या.
२७ हजार गोळ्या आणि १२.७१ किलो वजनाचा मुद्देमाल
पोलिसांनी केलेल्या कारवाईत Nitrazepam Tablets Button या अंमली पदार्थाच्या तब्बल २७ हजार गोळ्या जप्त करण्यात आल्या. या गोळ्यांचे एकूण वजन १२.७१ किलो ग्रॅम असून, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ६४ लाख ५ हजार रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
आरोपी हे नशेच्या गोळ्या स्वतःच्या ताब्यात ठेवून ग्राहकांना नशेसाठी विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही आरोपींवर NDPS कायद्यानुसार गुन्हा
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर यापूर्वीही एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS Act कलम 8 (क), 22 (क) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी—
१) पुरुष, वय ४४ वर्षे
रा. ठी. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई.
२) पुरुष, वय ५० वर्षे
रा. ठी. कौसा, मुंब्रा, जि. ठाणे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपआयुक्त (प्रकटीकरण-१) नवनाथ ढवळे तसेच सहायक पोलीस आयुक्त (डी पूर्व) धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कक्ष-६चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक सुशांत सावंत आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
मुंबईत अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात सुरू असलेल्या कारवाईचा एक भाग म्हणून या कारवाईकडे पाहिले जात आहे. मोठ्या प्रमाणावर नायट्राझेपामच्या गोळ्या जप्त झाल्याने अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीच्या नेटवर्कवर पोलिसांनी मोठा आघात केला आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0