पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष शाखेच्या स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त विशेष शाखेच्या स्वतंत्र कार्यालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विशेष शाखेचे कामकाज अधिक सुलभ व जलद गतीने करण्याचे निर्देश देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष शाखेच्या स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड पोलीस, पोलीस उपआयुक्त विशेष शाखा, विशेष शाखा कार्यालय, विनय कुमार चौबे, धीरज पाटील, पिंपरी चिंचवड

प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. २४ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त, विशेष शाखेच्या स्वतंत्र कार्यालयाचे उद्घाटन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष शाखेचे कामकाज अधिक सुलभ, प्रभावी आणि जलद गतीने व्हावे, या उद्देशाने हे स्वतंत्र कार्यालय तयार करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त विशेष शाखेच्या पदावर श्री. धीरज पाटील यांची २७ मे २०२६ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार विशेष शाखेच्या कामकाजासाठी स्वतंत्र कार्यालय तयार करण्यात आले. या कार्यालयाचे उद्घाटन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते फीत कापून तसेच फलकाचे अनावरण करून करण्यात आले.

यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष शाखेकडील कामकाज अधिक सुलभ आणि जलद गतीने होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्वांनी कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमता आणि समर्पित भावनेने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वरिष्ठ अधिकारी उपस्थित

या उद्घाटन कार्यक्रमास पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड (गुन्हे), अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली (प्रादेशिक विभाग), पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार (गुन्हे शाखा), पोलीस उपआयुक्त गणेश इंगळे (मुख्यालय), पोलीस उपआयुक्त संदीप आठाळे (झोन-१), पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव (झोन-२), पोलीस उपआयुक्त मारुती जगताप (झोन-३), पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख (वाहतूक शाखा) यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

तसेच सहायक पोलीस आयुक्त सुनील पंधरकर (विशेष शाखा), सहायक पोलीस आयुक्त रणजीत पाटील (प्रशासन), सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड (गुन्हे-१), सहायक पोलीस आयुक्त सचिन कदम (गुन्हे-२), सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव (एमआयडीसी भोसरी विभाग), सहायक पोलीस आयुक्त रोहिणी बाणकर (सायबर/आर्थिक गुन्हे शाखा), वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कदम (विशेष शाखा-१), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरवाड (विशेष शाखा-२) तसेच विशेष शाखा-१ व विशेष शाखा-२ कडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.

विशेष शाखेसाठी स्वतंत्र कार्यालय उपलब्ध झाल्यामुळे शाखेचे प्रशासकीय कामकाज अधिक परिणामकारकपणे पार पाडण्यास मदत होणार असून, नागरिकांशी संबंधित विविध कामकाजातही अधिक सुलभता आणि गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.