पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज सुरू; तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी**

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, १८ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप आणि दरमहा ९ हजार रुपयांचे विद्यावेतन मिळणार आहे.

Jul 8, 2026 - 21:01
 0  8
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज सुरू; तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी**
पंतप्रधान इंटर्नशिप योजना, PM Internship Scheme

मुंबई प्रतिनिधी नरेश शिंदे 

देशातील युवकांना उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि रोजगारक्षम कौशल्यांचा विकास व्हावा, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या योजनेत पात्र उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप देण्यात येणार असून दरमहा ९,००० रुपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in⁠� या पोर्टलवर आपले प्रोफाइल तयार करून विविध क्षेत्रांतील उपलब्ध इंटर्नशिपसाठी अर्ज करावेत.

सध्या उपलब्ध असलेल्या प्रमुख इंटर्नशिप संधी

एचडीएफसी बँक लिमिटेड – विक्री व विपणन (Sales & Marketing), पदवीधरांसाठी १८ जागा, अर्जाची अंतिम मुदत ३० जुलै.

चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड – विक्री व विपणन, बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ४ जागा, अंतिम मुदत २७ जुलै.

रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड – विक्री व विपणन, पदवीधरांसाठी संधी, अर्जाची अंतिम तारीख २४ जुलै.

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड – विक्री व विपणन, पदवीधरांसाठी १३ जागा, अंतिम मुदत १८ जुलै.

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) – ग्राहक सेवा (Customer Care/Service), बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी २ जागा, अंतिम मुदत १४ जुलै.

उमेदवारांना अर्जाच्या अंतिम मुदतीपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहे.

योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा संरक्षण दिले जाणार आहे. याशिवाय संबंधित कंपनीकडून अतिरिक्त अपघात विमा संरक्षण देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1