विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी घेतले श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. राज्यातील नागरिकांना सुख-समृद्धी लाभावी, चांगला पाऊस पडावा आणि पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी त्यांनी देवीच्या चरणी प्रार्थना केली.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी घेतले श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन
राहुल नार्वेकर, महालक्ष्मी अंबाबाई मंदिर, कोल्हापूर, विधानसभा अध्यक्ष, श्री महालक्ष्मी अंबाबाई,

प्रतिनिधी: उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. २२ (जिमाका) : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज कोल्हापूर येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची मनोभावे पूजा करून राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

दर्शनानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, राज्यातील सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभावे तसेच राज्यात चांगला पाऊस पडून पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केली आहे.

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून, देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विधानसभा अध्यक्षांच्या या भेटीच्या वेळी मंदिर परिसरात आवश्यक धार्मिक विधी पार पडले.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे-परीट, तसेच महादेव दिंडे, गणेश निर्लेकर, समित कदम आणि विजय जाधव आदी उपस्थित होते.

श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या दर्शनानंतर ॲड. राहुल नार्वेकर यांनी उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधला.