राज्य कामगार विमा योजनेच्या सेवा अधिक सक्षम करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोडीकर

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत कामगारांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी योजना अधिक सक्षम करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोडीकर यांनी दिले. बंद दवाखाने सुरू करणे, नवीन सुविधा उभारणे आणि वैद्यकीय सेवा सुधारण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

May 12, 2026 - 03:10
 0  15
राज्य कामगार विमा योजनेच्या सेवा अधिक सक्षम करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोडीकर
मेघना साकोरे-बोडीकर, राज्य कामगार विमा योजना, कामगार आरोग्य

मुंबई, दि. ११ : राज्यातील कामगारांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य कामगार विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोडीकर यांनी सांगितले.

निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी राज्य कामगार विमा योजनेचा सविस्तर आढावा घेतला.

बैठकीत योजनेअंतर्गत नोंदणीकृत सदस्यांची संख्या, सदस्यांकडून प्राप्त होणारी वर्गणी, विमा योजनेंतर्गत कार्यरत नसलेले दवाखाने, नवीन दवाखाने सुरू करण्याबाबतची स्थिती तसेच राज्यातील कामगारांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या खाटांची माहिती यावर सखोल चर्चा करण्यात आली.

राज्यमंत्री साकोरे-बोडीकर यांनी कामगारांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत विमा योजनेंतर्गत बंद असलेल्या रुग्णालये व दवाखान्यांची कार्यक्षमता वाढविण्याचे निर्देश दिले. औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाढत्या गरजा लक्षात घेऊन नवीन दवाखाने सुरू करण्याच्या प्रस्तावांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

कामगार विमा योजनेंतर्गत उपलब्ध नसलेल्या रुग्णखाटा, उपचार सुविधा, वैद्यकीय मनुष्यबळ आणि औषध उपलब्धता याबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीस संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 5
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.