पुण्यात महिला बचत गटांच्या 'दिवाळी बचत बाजारा'ला सुरुवात; १३ ठिकाणी १४१५ बचत गटांचे स्टॉल्स, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत शहरातील १३ ठिकाणी दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून १४१५ बचत गटांना व्यासपीठ मिळाले आहे.

पुण्यात महिला बचत गटांच्या 'दिवाळी बचत बाजारा'ला सुरुवात; १३ ठिकाणी १४१५ बचत गटांचे स्टॉल्स, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे महानगरपालिका, दिवाळी बचत बाजार, समाज विकास विभाग, महिला बचत गट, पीएमसी, मंजुषा नागपुरे, चंद्रकांत पाटील, फराळ स्टॉल, Pune PMC Diwali Bachat Bazar

प्रतिनिधी : रोहन सोनाळे 

पुणे महापालिकेचा उपक्रम: शहरातील १३ ठिकाणी 'दिवाळी बचत बाजार' सुरू; १४१५ बचत गटांना मिळाले व्यासपीठ  

पुणे:

पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला सक्षमीकरणाला बळ देण्यासाठी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे 'दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री' उपक्रम शहरात उत्साहात सुरू झाला आहे. शहरातील तब्बल १३ महत्त्वाच्या ठिकाणी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून एकूण १४१५ बचत गटांना याद्वारे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.   

या उपक्रमाचे मुख्य उद्घाटन पु. ल. देशपांडे उद्यान (सिंहगड रोड) येथे मा. सौ. मंजुषा नागपुरे (महापौर, पुणे) यांच्या शुभहस्ते पार पडले. तसेच वि. दा. सावरकर मैदान (कोथरूड) येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याशिवाय कै. नथुजी मेंगडे जलतरण तलाव (कर्वेनगर) येथेही ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले.   

विविध भागांत लोकप्रतिनिधींच्या हस्ते उद्घाटन:

शहरातील विविध केंद्रांवर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले:   

बालगंधर्व रंगमंदिर: उपमहापौर परशुराम वाडेकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, नगरसेविका भक्ती गायकवाड व सपना छाजेड.   

गेरा आय.टी. पार्क (खराडी): आमदार बापूसाहेब पठारे.   

नॉर्थ डहाणूकर कॉलनी (कोथरूड): नगरसेविका वसंती जाधव, नगरसेवक दिनेश माथवड व हर्षला माथवड.   

चिंतामणराव देशमुख प्राथमिक शाळा (बिबवेवाडी): नगरसेविका रुपाली धाडवे, तन्वी दिवेकर, मानसी देशपांडे, वर्षा साठे व नगरसेवक राजेंद्र शिळीमकर.   

कै. बाळासाहेब कवडे क्रीडांगण (घोरपडी): आमदार चेतन तुपे, नगरसेविका सुरेखा कवडे व हिमाली कांबळे.   

महात्मा फुले सांस्कृतिक भवन (वानवडी): नगरसेवक प्रशांत जगताप, नगरसेविका कालिंदा पुंडे व कोमल शेंडकर.   

पुण्यनगरी (वडगाव शेरी): नगरसेवक नारायण गलांडे, श्वेता गलांडे व ज्ञानेश्वर शिंदे.   

कात्रज डेअरी एक्सपो मैदान (कात्रज): प्रभाग समिती अध्यक्षा प्रतिभा चोरगे, रंजना टिळेकर, सहाय्यक आयुक्त सुरेखा भनगे व अमोल पवार, नगरसेविका तेजस्वी बदक व पूजा कदम.   

पॉप्युलर नगर (वारजे माळवाडी): विरोधी पक्षनेते निलेश निकम व बाबा धुमाळ.   

भारत माता रोड (धानोरी): नगरसेविका अश्विनी भंडारी व संगीता दांगट.   

घरगुती फराळ ते हस्तकलेच्या वस्तूंना पसंती:

या बचत बाजारात महिला लाभार्थी तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये दिवाळी फराळ (चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा, शेव, अनारसे), वांग्याचे भरीत, पिठलं-भाकरी, सॉस, शीतपेये, सोलकढी, लोणची, पापड, विविध मसाले, पिठे, शेवया, कुरडया तसेच शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.   

याशिवाय घरगुती वापराच्या वस्तू जसे की स्वेटर्स, रांगोळी, रंग, तयार कपडे, तोरणे, आयुर्वेदिक उत्पादने, प्लॅस्टिकला पर्याय म्हणून कापडी व कागदी पिशव्या, लेदर बॅग्स, फाइल्स-फोल्डर्स, ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती, पणती आणि आकाशकंदील अशा विविध उत्पादनांचा समावेश आहे.   

नागरिकांना भेटीचे आवाहन:

प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांतच नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे ३० लाख १० हजार ६५६ रुपयांची विक्री नोंदवली गेली आहे. हे प्रदर्शन दिनांक ०४/११/२०२६ पर्यंत सुरू राहणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन महिला व दिव्यांग बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे उपआयुक्त (आबा राऊत) यांनी केले आहे.