राष्ट्रवादीला धक्का; सेल राज्यप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
उदय कासारे - मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे.
असंघटित कामगार विभागाचे मनोज व्यवहारे, वाहतूक विभागाचे सचिन जाधव आणि उद्योग विभागाचे सुभाष मालपाणी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी पार पडला.
राजीनाम्यांनंतर वाढली पक्षगळती
या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) दिवशी पक्ष नेतृत्वाकडे राजीनामे सादर केले होते. त्यावेळी अजित पवार यांनी संयमाची भूमिका घेत निर्णय लांबवला होता. मात्र त्यांच्या निधनानंतर कोणतीही सविस्तर चर्चा न करता हे राजीनामे मंजूर करण्यात आले, अशी माहिती समोर येत आहे.
या घटनेमुळे पक्षांतर्गत खळबळ उडाली असून संघटनात्मक पातळीवर अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास
यावेळी मनोज व्यवहारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “एकनाथ शिंदे हे सामान्य पार्श्वभूमीतून आलेले नेतृत्व असून ते काम करणाऱ्या माणसाला न्याय देतात. त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू आणि पक्ष तळागाळापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करू.”
राजकीय समीकरणांवर परिणाम शक्य
गेल्या काही काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि संघटनात्मक अडचणींची चर्चा सुरू होती. स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांमध्ये वाढती अस्वस्थता दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
1
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0