एमएमआरडीए–रायगड-पेण ग्रोथ सेंटर करार; स्मार्ट टाऊनशिप विकासाला गती

मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि रायगड-पेण ग्रोथ सेंटर यांच्यात महत्त्वपूर्ण करार झाला. या करारामुळे पेण तालुक्यात स्मार्ट आणि आत्मनिर्भर टाऊनशिप विकसित होणार आहे.

Apr 21, 2026 - 15:41
 0  5
एमएमआरडीए–रायगड-पेण ग्रोथ सेंटर करार; स्मार्ट टाऊनशिप विकासाला गती
एमएमआरडीए, रायगड पेण ग्रोथ सेंटर, देवेंद्र फडणवीस, स्मार्ट सिटी

प्रतिनिधी –दिपक शिंदे

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि रायगड-पेण ग्रोथ सेंटर यांच्यात भागधारक करार करण्यात आला. या करारामुळे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नियोजित विकासाला चालना मिळणार आहे.

या करारानुसार रायगड-पेण ग्रोथ सेंटर लिमिटेडच्या माध्यमातून एकीकृत टाऊनशिप धोरण राबवण्यात येणार असून, हा परिसर स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे आधुनिक सुविधा, पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध शहरी विकास साध्य होणार आहे.

विशेष म्हणजे, हा प्रकल्प प्रमुख बंदर क्षेत्राशी जोडलेला असल्याने औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच आत्मनिर्भर टाऊनशिप संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प स्थानिक रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

या वेळी महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, गुंतवणूक व धोरण विषयक सल्लागार कौस्तुभ धवसे तसेच ऑरेंज सिटी ग्रुपचे निखिल गांधी उपस्थित होते.

रायगड-पेण ग्रोथ सेंटर प्रकल्पामुळे भविष्यात या भागाचा वेगाने विकास होऊन तो राज्यातील महत्त्वाचा आर्थिक व औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0