भीम गीतांच्या सुरेल सादरीकरणात सामाजिक समता सप्ताहाची सांगता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामाजिक समता सप्ताह व ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’चा समारोप अभिजित कोसंबी, मेघानंद जाधव आणि मधुकर कदम यांच्या सुरेल भीम गीतांनी उत्साहात पार पडला.

Apr 21, 2026 - 18:19
 0  1
भीम गीतांच्या सुरेल सादरीकरणात सामाजिक समता सप्ताहाची सांगता
भीम गीत कार्यक्रम, अभिजित कोसंबी,

पुणे प्रतिनिधी – रोहन सोनाळे 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित सामाजिक समता सप्ताह आणि ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’चा समारोप सुरेल संगीत आणि भीम गीतांच्या सादरीकरणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमातून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहभर विविध प्रबोधनात्मक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये समतेच्या विचारांची जागरूकता निर्माण करण्यात आली.

समारोपाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी यांनी आपल्या मधुर आवाजात भीम गीतांचे सादरीकरण करत वातावरण भारावून टाकले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मेघानंद जाधव आणि मधुकर कदम यांनीही आपल्या गीतांमधून सामाजिक समतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.

या संपूर्ण उपक्रमाद्वारे समाजात समता, बंधुता आणि एकात्मतेची मूल्ये अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमास नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0