राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी त्यांच्या समतावादी विचारांची आणि सामाजिक योगदानाची उजळणी करण्यात आली.
नवी दिल्ली, दि. 19 : समाजसुधारक आणि थोर विचारवंत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना अभिवादन करण्यात आले.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार तसेच महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रसंगी प्रमोद कोलपते यांनी महात्मा बसवेश्वर यांनी मांडलेले समतावादी विचार, समाजातील जातिभेद निर्मूलनासाठी केलेले कार्य आणि लोकशाही मूल्यांच्या रुजवणुकीसाठी दिलेले योगदान याबाबत माहिती दिली. त्यांनी बसवेश्वरांच्या विचारांचा आजच्या समाजातही मोठा प्रभाव असल्याचे नमूद केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0