मानव एकता दिवसानिमित्त पुण्यात भव्य रक्तदान शिबिरे; सेवा व बंधुभावाचा संदेश
संत निरंकारी मिशनतर्फे २४ एप्रिल रोजी ‘मानव एकता दिवस’ साजरा करण्यात येणार असून पुण्यासह देशभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सेवा, समरसता आणि बंधुभावाचा संदेश दिला जाणार आहे.
पुणे प्रतिनिधी –रोहन सोनाळे
संत निरंकारी मिशनतर्फे बाबा गुरबचन सिंह जी यांच्या पावन स्मृतीनिमित्त ‘मानव एकता दिवस’ २४ एप्रिल २०२६ रोजी श्रद्धा, समर्पण आणि सेवा भावनेत साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने पुण्यासह देशभरात भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या आशीर्वादाने पुण्यातील विविध सत्संग भवनांमध्ये विशेष सत्संगाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांमधून भक्तांना आध्यात्मिकता, प्रेम आणि एकत्वाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
पुण्यातील संत निरंकारी सत्संग भवन, विजयनगर (काळेवाडी) तसेच फॉरेस्ट पार्क, चंदननगर येथे २४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये वाय. सी. एम. रुग्णालय, ससून रुग्णालय आणि संत निरंकारी रक्तपेढीचे अनुभवी डॉक्टर व वैद्यकीय पथक सेवा देणार आहेत.
या उपक्रमातून मानवतेप्रती संवेदनशीलता आणि निःस्वार्थ सेवेचा संदेश दिला जाणार आहे. तसेच देश-विदेशातील विविध शाखांमध्येही श्रद्धाळू भक्त एकत्र येऊन या दिवशी सत्संग व सेवा उपक्रम राबवणार आहेत.
हा दिवस बाबा गुरबचन सिंह जी आणि चाचा प्रताप सिंह जी यांच्या स्मृतीला समर्पित असून त्यांच्या जीवनातील त्याग, समर्पण आणि मानवतेच्या सेवेच्या आदर्शांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात प्रेम, शांती, समरसता आणि बंधुभावाची भावना दृढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0