पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशनची मागणी; अमित गोरखे यांचा बैठकीत मुद्दा
पिंपरी शहरातील वाढत्या वीज समस्यांवर तोडगा म्हणून नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वीज वितरण समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाश भवन, सेनापती बापट मार्ग येथे बैठक पार पडली. या बैठकीत अमित गोरखे यांनी पिंपरी शहरासाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्याची प्रमुख मागणी केली.
पिंपरीतील संभाजीनगर, काळभोरनगर, विद्यानगर, दत्तनगर, इंदिरानगर, शंकरनगर, मोरवाडी, आकुर्डी, प्राधिकरण, पिंपरी गाव, दापोडी, संत तुकाराम नगर आदी भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या वाढल्या आहेत. सध्या टाटा टेल्को उपकेंद्रावरून या सर्व भागांना तसेच चाकण, आनंदी, जाधववाडी, चिखली या भागांनाही वीजपुरवठा होत असल्याने उपकेंद्रावर ताण वाढला आहे.
यामुळे पिंपरीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारणे अत्यावश्यक असल्याचे आमदार गोरखे यांनी स्पष्ट केले.
आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख मागण्या:
अतिरिक्त वीज भार असलेल्या रोहित्रांची क्षमता वाढविणे
वीज अपघात टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर्सना FRP फेन्सिंग करणे
जुन्या LT व HT केबल्स बदलणे
खराब फीडर पिलर बदलणे
HT व LT लाईन्स भूमिगत करणे
नवीन सबस्टेशन उभारणे
अपघाती क्षेत्रातील ट्रान्सफॉर्मर्स स्थलांतरित करणे
शहरातील नागरिकांना वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन सबस्टेशन उभारणे हाच एकमेव पर्याय असल्याचे आमदार गोरखे यांनी नमूद केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
