केटीएचएम महाविद्यालयात २०० विद्यार्थ्यांचा सलग १८ तास ‘अभ्यास अभियान’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून ‘अभ्यास अभियान’ राबविले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Apr 18, 2026 - 00:44
 0  1
केटीएचएम महाविद्यालयात २०० विद्यार्थ्यांचा सलग १८ तास ‘अभ्यास अभियान’
केटीएचएम महाविद्यालय, नाशिक बातम्या, अभ्यास अभियान, आंबेडकर जयंती, १८ तास अभ्यास,

नाशिक ब्यूरो 

नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात ‘सलग १८ तास अभ्यास अभियान’ राबविण्यात आले. या उपक्रमामध्ये सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सलग १८ तास अभ्यास करून डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असा आदर्श उपक्रम साकारला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपप्राचार्य, शिक्षणाधिकारी डॉ. के. एस. शिंदे, विभागप्रमुख, प्राध्यापक तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील वाचन कक्षामध्ये विविध शाखांतील सुमारे २०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सलग १८ तास अभ्यास करत या अभियानात उत्साहाने सहभाग नोंदविला.

प्राचार्या डॉ. कल्पना आहिरे यांनी विद्यार्थ्यांना ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा डॉ. आंबेडकरांचा संदेश समजावून सांगितला. तसेच त्यांच्या कार्याची सविस्तर माहितीही विद्यार्थ्यांना दिली.

या उपक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. तुषार पाटील यांनी केले. संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, पदाधिकारी, संचालक तसेच शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0