नाशिकमध्ये भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

नाशिक येथे अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पंचवटी केंद्र व महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

Apr 20, 2026 - 00:52
Apr 20, 2026 - 01:22
 0  46
नाशिकमध्ये भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
नाशिकमध्ये भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

नाशिक येथे अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था पंचवटी कें

द्र आणि महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि भगवान परशुराम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे, वेदमूर्ती रवींद्र पैठणे गुरुजी, नगरसेविका चंद्रकला धुमाळ, दिगंबर धुमाळ, तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल देशपांडे, कार्यवाह अॅड. सुहास भनगे, कोषाध्यक्ष उल्हास पंचाक्षरी आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. खासदार भास्करराव भगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्ञान आणि तपश्चर्येचा संगम म्हणजे भगवान परशुराम असून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते. विद्यार्थ्यांनी समाजासाठी चांगले कार्य करण्याचा संकल्प करावा, असे त्यांनी आवाहन केले.

वेद विद्या प्रतिष्ठानमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त वेद शिक्षण दिले जात असून या शिक्षणाला केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाची मान्यता मिळाल्याची माहिती वेदमूर्ती रवींद्र पैठणे यांनी दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचवटी केंद्राचे पदाधिकारी, वेदपाठशाळेचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी वेदघोष करून सहभाग नोंदवला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0