राघवण’ कादंबरीचा भव्य प्रकाशन सोहळा उद्या नाशिकमध्ये

प्रा. जगदीश देवरे लिखित ‘राघवण’ कादंबरीचा प्रकाशन सोहळा १८ एप्रिल रोजी नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारकात होणार असून, अरविंद जगताप यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन होणार आहे.

Apr 17, 2026 - 16:40
 0  3
राघवण’ कादंबरीचा भव्य प्रकाशन सोहळा उद्या नाशिकमध्ये
राघवण कादंबरी, जगदीश देवरे, नाशिक

नाशिक ब्यूरो 

नाशिक : कौटिल्य प्रकाशन, नवी दिल्ली प्रकाशित प्रा. Jagdish Devre लिखित ‘राघवण’ या कादंबरीचा भव्य प्रकाशन सोहळा शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता Kusumagraj Smarak येथील विशाखा सभागृहात संपन्न होणार आहे.

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सह्याद्री देवराई फाउंडेशनचे उपाध्यक्ष, लेखक, दिग्दर्शक व गीतकार Arvind Jagtap भूषवणार असून त्यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

‘राघवण’ ही केवळ एक कथा नसून ती विचारप्रवर्तक प्रवास मांडणारी कादंबरी आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेला राघवण प्रदूषणामुळे बदलणाऱ्या पृथ्वीबद्दल चिंतित होतो आणि परिस्थिती बदलण्यासाठी धाडसी निर्णय घेतो. त्याच्या या कृती मानवजातीसाठी वरदान ठरतील की शाप, हा प्रश्न लेखकाने वाचकांसमोर खुला ठेवला आहे.

या कादंबरीत भारताचा इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमान यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले असून “मनोरंजनासोबत ज्ञानार्जन” हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजातील विविध पैलूंना स्पर्श करत वाचकांना नवीन दृष्टिकोन देणारी ही कादंबरी असल्याचे सांगितले जात आहे.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून कादंबरीकार प्रा. जगदीश देवरे व सौ. शीतल देवरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मान्यवरांचे मनोगत, लेखकाचे विचार आणि अध्यक्षीय भाषणातून साहित्य, समाज आणि समकालीन विषयांवर प्रकाश टाकला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असून, साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0