चिखलीत प्रथमच भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न

चिखली येथे आयोजित ‘विराट हिंदू संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात समाजातील एकता, सांस्कृतिक मूल्यांची जपणूक, स्वदेशीचा आग्रह आणि सामाजिक जबाबदारी यावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. विविध सामाजिक संस्था, महिला गट आणि नागरिकांचा मोठा सहभाग या संमेलनाला लाभला.

Apr 21, 2026 - 01:22
 0  3
चिखलीत प्रथमच भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न
विराट हिंदू संमेलन, चिखली बातमी, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक एकता, हिंदू समाज, सांस्कृतिक मूल्ये, स्वदेशी, पर्यावरण जनजागृती, महाराष्ट्र बातम्या, पिंपरी चिंचवड

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

चिखली येथे ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न

चिखली, दि. २० : येथील नेवाळे वस्ती परिसरात आयोजित ‘विराट हिंदू संमेलन’ मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडले. या संमेलनाला चिखली तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिक, महिला बचत गट, भजनी मंडळे, सामाजिक संस्था आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी समाजातील एकता, सांस्कृतिक जपणूक आणि संघटित होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. धर्म, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल राखत देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. कुटुंबव्यवस्था मजबूत ठेवणे, पर्यावरण संरक्षण, पाण्याची बचत आणि स्वदेशी वस्तूंचा वापर यांसारख्या मुद्द्यांवरही वक्त्यांनी भर दिला.

या संमेलनात विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. युवकांनी समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच सकारात्मक विचारसरणी जोपासावी, असेही यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधी, भारतमातेचे पूजन आणि पारंपरिक युद्धकलेचे सादरीकरण करण्यात आले. तलवारबाजी आणि दांडपट्टा यांसारख्या मर्दानी खेळांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाचे संयोजकांनी या संमेलनाचे उद्दिष्ट समाजातील एकात्मता वाढवणे, सांस्कृतिक मूल्यांचा जागर करणे आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा देणे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन अनुपमाताई पाटील यांनी मानले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0