ठाणे–मिरा भाईंदरमध्ये राजकीय वाद पेटला; नरेंद्र मेहता यांचे प्रताप सरनाईक यांना खुले आव्हान

ठाणे आणि मिरा-भाईंदरच्या राजकारणात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्यावर तीव्र टीका करत खुले आव्हान दिले आहे.

Apr 20, 2026 - 14:27
 0  2
ठाणे–मिरा भाईंदरमध्ये राजकीय वाद पेटला; नरेंद्र मेहता यांचे प्रताप सरनाईक यांना खुले आव्हान
नरेंद्र मेहता, प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक, ठाणे राजकारण

ठाणे/प्रतिनिधी –दिपक शिंदे

ठाणे आणि मिरा-भाईंदर परिसरातील राजकारणात पुन्हा एकदा ठिणगी पडली असून भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. मेहता यांनी सरनाईक आणि त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका करत थेट आव्हान दिले आहे.

"आम्ही आमचे सर्वस्व गमावले आहे, त्यामुळे आता आम्हाला कशाचीही भीती नाही. जर आम्ही तुमच्या मागे लागलो, तर तुम्ही आणि तुमचे वडील समाजात तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही," असा इशारा नरेंद्र मेहता यांनी दिला.

याचबरोबर त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप करत, "सरनाईक यांच्यासारखा खोटारडा माणूस संपूर्ण जगात नसेल," असे वक्तव्य केले. तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप करत आधी स्वतःकडे पाहावे, असा टोला लगावला.

मिरा-भाईंदर परिसरात राजकीय वर्चस्वासाठी सुरू असलेल्या संघर्षातून हा वाद अधिक तीव्र झाला असून, आता हा संघर्ष वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. मात्र, यावेळी वापरलेली आक्रमक भाषा आणि दिलेले खुले आव्हान यामुळे हा वाद अधिक चर्चेत आला आहे. आता सरनाईक कुटुंबीय या आरोपांना काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0