ठाण्यात कोकण विकास प्रतिष्ठान आणि संस्कार संस्था आयोजित १९वा आंबा महोत्सव Slug:
ठाणे पश्चिमेतील गावदेवी मैदानात १ मे ते १० मे दरम्यान १९वा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कोकणातील अस्सल हापूस, पायरी, केसर आंब्यांसह विविध कोकणी उत्पादनांचे ३५ स्टॉल येथे उपलब्ध असतील.
ठाणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग, कृषी पणन मंडळ तसेच संस्कार संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १९व्या आंबा महोत्सवाचे आयोजन ठाणे पश्चिमेतील गावदेवी मैदानात १ मे ते १० मे या कालावधीत करण्यात आले आहे. अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष, नगरसेवक, माजी उपमहापौर तसेच कोकण विकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
३५ स्टॉलमध्ये कोकणातील खास उत्पादने
या आंबा महोत्सवात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्यांसह विविध कोकणी पदार्थांची विक्री होणार आहे.
उपलब्ध उत्पादने:
आंबा
फणस पोळी
सरबते
काजू
मालवणी मसाले
पापड
इतर कोकणी घरगुती पदार्थ
एकूण ३५ स्टॉल येथे उभारण्यात येणार आहेत.
“हा महोत्सव म्हणजे चळवळ”
आमदार संजय केळकर म्हणाले की, दरवर्षी होणारा हा आंबा महोत्सव केवळ व्यापारी बाजार नसून कोकणातील शेतकऱ्यांसाठी एक चळवळ आहे. लाखो ग्राहक येथे भेट देतात. त्यामुळे जास्तीत जास्त खरेदी करून संकटात सापडलेल्या कोकणातील शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध
प्रत्यक्ष विक्रीसोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. ग्राहकांनी अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
कोकणातील आंबा उत्पादन घटले
यावेळी आंबा उत्पादनाबाबतही माहिती देण्यात आली. अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण, मोहोर जळणे, फळगळ तसेच थ्रीप्स रोग आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे यंदा केवळ १५ टक्केच आंबा पीक आले असल्याचे सांगण्यात आले.
यामुळे कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठविल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार असला तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
