सेठ ग.भि. मुरारका हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सेठ ग.भि. मुरारका हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भाषण व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट सादरीकरण केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सेठ ग.भि. मुरारका हायस्कूलमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. भाषण व निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत त्यांच्या विचारसरणीवर प्रभावी मांडणी केली. गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, सामाजिक समता व राष्ट्रनिर्मितीची जाणीव अधिक दृढ झाली.

Apr 14, 2026 - 16:56
Apr 14, 2026 - 18:35
 0  58
सेठ ग.भि. मुरारका हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सेठ ग.भि. मुरारका हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

सेठ ग.भि.मुरारका हायस्कूल मध्ये डॉ बाबासाहेबआंबेडकर जयंती साजरी .

 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विद्यालयात भाषण विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदविला.

विद्यार्थ्यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या महान विचारसरणीवर, सामाजिक समतेच्या तत्त्वांवर तसेच त्यांच्या अद्वितीय कार्यावर आधारित प्रभावी भाषणे व दर्जेदार निबंध सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारमंथनाची प्रवृत्ती विकसित होत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम बक्षीस देऊन करण्यात आला. निबंध स्पर्धेत संस्कार तायडे, प्रगती शेगोकार, श्रद्धा भगेवार,सृष्टी सहस्त्रबुद्धे,प्रतीक्षा मीरकुटे,गौरी भटकर,यांनी उत्कृष्ट निबंध लेखन केले तर उत्कृष्ट भाषण स्पर्धेत नूतन गवारे, आदिती वाकोडे,प्रगती वाकोडे,श्रद्धा भगेवार,नम्रता ढगे,जय ताठोड,अनुष्का अग्रवाल यांनी उत्कृष्ट भाषण स्पर्धेत बाजी मारली.परीक्षक म्हणून श्री विनोद भारसाकळे व श्री राजेश गवई सर यांनी काम पाहिले .कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे व्यवस्थापक साहेब सेठ सतीश कुमार मुरारका यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु दिव्या वानखडे व पूनम मीरकुटे यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री डी आर गावंडे सर,ज्येष्ठ शिक्षक श्री डी व्ही हाडोळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तसेच यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिर्मितीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना चिक्की आणि सोनपापडी देऊन करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0