राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून अभिवादन.

Apr 14, 2026 - 22:57
 0  6
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
राजधानीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि.१४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

कोपरनिकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला विशेष आयुक्त श्रीमती श्वेता सिंघल यांनी पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर नवीन महाराष्ट्र सदनातील प्रांगणात उभारलेल्या त्यांच्या पुतळ्यासही त्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महामानवाला आदरांजली वाहिली.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी डॉ. आंबेडकर यांच्या महान कार्याचा आणि त्यांनी दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचा आढावा उपस्थितांना करून दिला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0