दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन पाळण्यात आला. निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या उपस्थितीत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचाराविरोधात शपथ घेतली.

May 21, 2026 - 19:50
 0  3
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
महाराष्ट्र सदन, दहशतवाद विरोधी दिन, राजीव गांधी पुण्यतिथी,

नवी दिल्ली | दि. 21

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त नवी दिल्ली येथील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन पाळण्यात आला. यानिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी 21 मे हा दिवस देशभरात "दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन" म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी तसेच शांतता, एकता आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ दिली.

या कार्यक्रमाला विशेष आयुक्त श्वेता सिंघल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार, व्यवस्थापक प्रमोद कोलपत्ते, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे तसेच महाराष्ट्र सदन आणि परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमात दहशतवाद आणि हिंसाचारमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.