वेळास येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन; संतोष आवटी यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न
वेळास येथे वाढत्या पर्यटन आणि सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्याचे उद्घाटन संतोष आवटी यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
रायगड प्रतिनिधी - उदय कळस
वेळास : कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या वेळास येथे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि संवेदनशील किनारपट्टीवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, त्याचे उद्घाटन दिघीसागरी पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक संतोष आवटी यांच्या हस्ते करण्यात आले.
वेळास, आदगाव आणि सर्वे या भागांतील विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे या परिसरात सुरक्षा वाढविण्याची गरज भासू लागली होती. याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते धवल तवसाळकर यांनी पुढाकार घेतला. ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि वेळास ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम यशस्वी झाला.
या उपक्रमासाठी चंद्रकांत बिराडी आणि जगदीश जगताप यांनी आर्थिक सहकार्य केले. तसेच पोल उभारणीपासून इतर तांत्रिक कामांमध्ये जनार्दन नाईक, नरेश जाधव, अनंत अपराध, साहिल दळवी, साहिल घोले, अनुज अपराध, विकेश लाड आणि साहिल पवार यांनी मोलाचे योगदान दिले.
उद्घाटनप्रसंगी संतोष आवटी यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की, दिघीसागरी पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व ग्रामपंचायतींना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. वेळास ग्रामपंचायतीने त्या सूचनांचे पालन करून हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थ आणि धवल तवसाळकर यांचे कौतुक केले.
या उपक्रमामुळे वेळास परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असून, पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण होणार आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0