कोल्हापुरात जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा; जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन
कोल्हापूरमध्ये जागतिक हिवताप दिनानिमित्त राजारामपुरी नागरी आरोग्य केंद्रात कार्यक्रम पार पडला. डासांपासून होणाऱ्या आजारांविषयी जनजागृतीसाठी आशा स्वयंसेविकांनी पथनाट्य सादर केले.
कोल्हापूर, दि. २५ (जिमाका) : सहाय्यक संचालक (हिवताप) व जिल्हा हिवताप कार्यालय तसेच नागरी आरोग्य केंद्र, राजारामपुरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा हिवताप कार्यालयात डॉ. सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेला अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी जे. के. कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांनी हिवताप दिनाचे महत्त्व स्पष्ट करत सर रोनाल्ड रॉस यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली.
याप्रसंगी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, धनश्री कोरवी, सामाजिक कार्यकर्ते महेश कोरवी, डॉ. पवार, डॉ. अमोल माने, डॉ. संदेश कांबळे, डॉ. योगिनी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी आशा स्वयंसेविकांनी डासांपासून होणारे आजार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक एस. पी. यादव, झोनल एंटोमोलॉजिस्ट सतीश सावंत, आरोग्य निरीक्षक अशोक थैल, कीटक संग्राहक सतीश ढेकळे, प्रणव जाधव, संजय पाटील, शंकर कुंभार, आरोग्य सेवक जावेद मुल्ला, ऋषिकेश परुळेकर, राहुल डोंगळे, संबंधित विभागाचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, शासकीय मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. योगिनी कुलकर्णी यांनी मानले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0