केईएम रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण; नवजात शिशू अतिदक्षता विभागासह नवीन विभाग सुरू
केईएम रुग्णालय येथे नवजात शिशू अतिदक्षता विभाग (NICU), मॅमोग्राफी मशीन तसेच आधुनिक सेमिनार हॉलचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी या सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
मुंबई प्रतिनिधी उदय कासारे
सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालय येथे विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नवजात शिशू अतिदक्षता विभाग (NICU), मॅमोग्राफी मशीन तसेच आधुनिक सेमिनार हॉल सुरू करण्यात आले आहेत.
या नव्या सुविधांमध्ये नवजात बालकांसाठी अत्यंत आवश्यक असलेला ‘नवजात शिशू अतिदक्षता विभाग’ (NICU), महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी अत्याधुनिक मॅमोग्राफी मशीन तसेच भावी डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी ‘सर्जिकल पॅथोलॉजी’ आणि ‘फिजिओलॉजी’ विभागांचे अद्ययावत सेमिनार हॉल यांचा समावेश आहे.
वाढत्या लोकसंख्येचा ताण लक्षात घेता केईएमसारख्या प्रतिष्ठित रुग्णालयात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. या सुविधांमुळे हजारो गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून मुंबईतील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला हरिष भांदिर्गे, किरण तावडे, अर्चना शिंदे, शरद उघडे, डॉ. शैलेंद्र मोहिते तसेच डॉ. हरिश पाठक यांच्यासह अनेक मान्यवर आणि डॉक्टर उपस्थित होते.
मुंबई महापालिका प्रशासन हे केवळ उपचार सेवा नव्हे तर आधुनिक निदान यंत्रणा आणि वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
What's Your Reaction?
Like
4
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

