शेअर बाजारात ९ लाखांचा तोटा; बुलढाण्यातील २२ वर्षीय युवक बेपत्ता

बुलढाण्यातील खामगाव येथे शेअर बाजारात ९ लाखांचे नुकसान झाल्याने २२ वर्षीय युवक बेपत्ता. पोलिसांकडे हरवल्याची नोंद; तपास सुरू.

Apr 12, 2026 - 00:18
 0  2
शेअर बाजारात ९ लाखांचा तोटा; बुलढाण्यातील २२ वर्षीय युवक बेपत्ता
Buldhana crime, Khamgaon missing youth,

बुलढाणा | दि. १० एप्रिल २०२६ :

शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे एका २२ वर्षीय युवकाने घर सोडल्याची घटना खामगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

गणेश शंकर बुरुकले (वय २२, रा. जनुना, ता. खामगाव) हा युवक ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स, नांदुरा रोड येथून बेपत्ता झाला. त्यानंतर सुमारे ४ वाजता त्याने एका मित्राला फोन करून आपला मोबाइल आणि चिठ्ठी ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये ठेवल्याची माहिती दिली.

सदर चिठ्ठीत त्याने शेअर बाजारात सुमारे ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याने घर सोडत असल्याचे नमूद केले आहे. तसेच “माझी वाट पाहू नका” असेही त्याने लिहिले असल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली असून खामगाव शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0