पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन तपास पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करून तब्बल ३६ लाख रुपये किमतीच्या २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. आरोपींनी पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातून वाहनचोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

May 8, 2026 - 17:31
May 8, 2026 - 17:31
 0  4
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त
दक्षिण महाळुंगे पोलीस, मोटारसायकल चोरी, पुणे क्राईम न्यूज

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून तब्बल ३६ लाख रुपये किमतीच्या २४ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विविध भागांतून दुचाकी चोरी करून त्या कमी किमतीत विक्री करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातून वाहन चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत विविध कंपन्यांच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून संबंधित गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने केली. वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असून नागरिकांनी वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0