घोटीतील भगतसिंग नगर येथे कामगार दिनानिमित्त झेंडावंदन; शेतकरी व कामगारांचा उत्स्फूर्त सहभाग
१ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील भगतसिंग नगरमध्ये झेंडावंदन कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेतकरी व कामगार वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला.
नाशिक ब्युरो, दि. १ मे : कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील भगतसिंग नगर, घोटी येथे शेतकरी व कामगार वर्गाच्या वतीने झेंडावंदन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य व अॅडव्होकेट विजय कर्नावट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमानंतर १ मे दिनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रमुख वक्ते अॅड. विजय कर्नावट तसेच सीटूचे जिल्हा सरचिटणीस कॉ. देविदास आडोळे यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी कामगार दिनाचा इतिहास, कामगार चळवळीचे महत्त्व तसेच सध्याच्या काळात कामगार वर्गावर होत असलेले विविध परिणाम आणि भविष्यातील आव्हानांबाबत माहिती दिली.
यावेळी उपस्थित शेतकरी व कामगारांना संघटित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास कॉ. चंद्रकांत लाखे, कॉ. आप्पासाहेब भोले, कॉ. तानाजी शिंदे, कॉ. शिवशंकर बरकले, कॉ. सदानंद शेळके, कॉ. मच्छिंद्र गतीर, कॉ. गोकुळ गोवर्धने, कॉ. राहुल गायके, कॉ. विष्णू गोवर्धने, कॉ. सुरेश थोरात, कॉ. गोरख किरवे, कॉ. राजेंद्र नाठे, कॉ. तुकाराम नाठे, कॉ. राजू अवघडे, कॉ. दशरथ गवळी, कॉ. सुरेश कोरडे, कॉ. रामदास चारसकर, कॉ. किसन गवळी, कॉ. त्र्यंबक खाडे, कॉ. रामचंद्र आघान, कॉ. भोरू हंबीर, कॉ. सावळीराम झोले, कॉ. किसन जगताप, कॉ. जाईबाई घाटाळ, कॉ. बाबाबाई लहांगे आदींसह अनेक कामगार व शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0