मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन सादर; देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पाला सुरुवात

मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टर प्लॅन सादर करण्यात आला. १४३ एकर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात हजारो रहिवाशांना मोफत घरे आणि व्यावसायिकांना गाळे देण्यात येणार आहेत.

Apr 17, 2026 - 19:41
 0  7
मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन सादर; देशातील सर्वात मोठ्या प्रकल्पाला सुरुवात
मोतीलाल नगर पुनर्विकास, MHADA Project,

मुंबई ब्यूरो -अनिल सावरे 

मुंबई: गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाचा बृहद मास्टर प्लॅन आज ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला. मुंबई मंडळामार्फत राबविण्यात येणारा हा प्रकल्प देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे.

मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे १४३ एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी C & DA (बांधकाम व विकास संस्था) मार्फत अदाणी समूहाकडून करण्यात येणार आहे. नियोजनबद्ध, आधुनिक आणि शाश्वत शहरी विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

या प्रकल्पांतर्गत ३७०२ पात्र रहिवाशांना प्रत्येकी १६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका विनामूल्य दिल्या जाणार आहेत. तसेच ३२८ पात्र व्यावसायिकांना सुमारे ९८७ चौरस फूट क्षेत्राचे गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

याशिवाय, सुमारे १६०० झोपडपट्टीधारकांना एसआरए योजनेअंतर्गत ३०० चौरस फूट घरे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या पुनर्विकास प्रकल्पामुळे ‘म्हाडा’ला मोठ्या प्रमाणात नवीन गृहसाठा उपलब्ध होणार असून, मुंबईतील गृहनिर्माण समस्येवर दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0