गटबाजी संपवून एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभारण्याचे आवाहन; प्रकाश खंडागळे यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षातील गटबाजी संपवून एकसंघ पक्ष उभारण्याचे आवाहन केले. रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांनी आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मध्ये प्रवेश केला.

Apr 24, 2026 - 01:51
 0  1
गटबाजी संपवून एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभारण्याचे आवाहन; प्रकाश खंडागळे यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश
गटबाजी संपवून एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभारण्याचे आवाहन; प्रकाश खंडागळे यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

मुंबई, प्रतिनिधी उदय कासारे

दि. २३ : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षातील गटबाजी संपवून एकसंघ आणि मजबूत पक्ष उभारण्याचे आवाहन केले असून, या आवाहनाला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आठवले यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे जाळे विस्तारले असून, महाराष्ट्रातच गटबाजीचे प्रमाण अधिक आहे.

याच पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश खंडागळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आठवले यांनी खंडागळे यांचे स्वागत करत, राज्यातील विविध छोटे गट एकत्र येऊन एकसंघ पक्ष उभारण्याची गरज व्यक्त केली.

यापूर्वीही महाराष्ट्र पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष मिलिंद सुर्वे यांनी आपला गट विलीन करून रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती देत, आणखी अनेक गट या दिशेने पुढाकार घेतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

प्रकाश खंडागळे यांनी सांगितले की, वेगवेगळे गट निर्माण करून गटबाजी वाढवण्यापेक्षा एकाच पक्षात विलीन होऊन मजबूत संघटन उभारणे गरजेचे आहे. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0