विधान भवनात ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण; सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते तिरंग्याला मानवंदना
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईतील विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसभापती सचिन अहिर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी नरेश शिंदे
मुंबई, दि. १५ ऑगस्ट २०२६ : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईतील विधान भवन येथे आज उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर प्रमुख उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवन परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (२) डॉ. विलास आठवले, सचिव (३) शिवदर्शन साठये, सभापती यांचे सचिव पंडित खेडकर यांच्यासह विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. राजू भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा पथकाने यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत सलामी दिली.
८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विधान भवनात झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्यात राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्ती आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले. महाराष्ट्र विधानमंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित मान्यवरांनी देशाच्या स्वातंत्र्याला अभिवादन करत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.