‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या मे 2026 अंकाचे सचिव आप्पासो धुळाज यांच्या हस्ते प्रकाशन

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या मे 2026 अंकाचे प्रकाशन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव तथा अतिथी संपादक आप्पासो धुळाज यांच्या हस्ते करण्यात आले. नव्या अंकात कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि ग्रामीण विकास यांसह विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Jun 2, 2026 - 22:13
 0  3
‘आपलं मंत्रालय’ गृहपत्रिकेच्या मे 2026 अंकाचे सचिव आप्पासो धुळाज यांच्या हस्ते प्रकाशन
आपलं मंत्रालय, गृहपत्रिका, आप्पासो धुळाज

मुंबई, दि. 2 : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या मे 2026 अंकाचे प्रकाशन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव तथा अतिथी संपादक आप्पासो धुळाज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, कक्ष अधिकारी प्रशांत वामन, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाचे सल्लागार कार्तिक पांडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

‘आपलं मंत्रालय’च्या नव्या अंकामध्ये विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीतील तंत्रज्ञान, सामाजिक संवेदनशीलता आणि सर्वसमावेशक विकासाचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. या अंकात कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, आरोग्य, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि ग्रामीण विकास यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय सांस्कृतिक, भावनिक आणि मानवी मूल्यांना स्पर्श करणारे विविध लेखही या अंकाचे वैशिष्ट्य ठरणार असून वाचकांसाठी ते विशेष आकर्षणाचा विषय ठरणार आहेत.

मंत्रालयातील विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा गृहपत्रिका प्रकाशनाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘आपलं मंत्रालय’ ही गृहपत्रिका शासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक व सर्जनशील अभिव्यक्तीला चालना देणारे प्रभावी माध्यम ठरत असून शासनाच्या विविध उपक्रमांची माहितीही या माध्यमातून व्यापक स्तरावर पोहोचत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0