भोंदू अशोक खरात चौथ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत; ईडीकडून मालमत्तांवर छापे
भोंदू अशोक खरातला चौथ्या गुन्ह्यात १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी; ईडीने २.५ कोटी रुपये गोठवले, मालमत्तांची चौकशी सुरू. अशोक खरात, नाशिक गुन्हा, ईडी छापे, पोलीस कोठडी, अंजली दमानिया, आर्थिक फसवणूक, कॉर्पोरेट सेक्स स्कँडल
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित भोंदू अशोक खरात याला चौथ्या गुन्ह्यात आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून खरात यांच्या विविध मालमत्तांवर छापे सुरू असून आतापर्यंत त्याच्या बँक खात्यांमधील सुमारे अडीच कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. तसेच त्याची महागडी कारही जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणात नाशिक पोलीस परिक्षेत्राचे आयजी दत्तात्रय कराळे यांच्याशी खरात यांचे नेमके संबंध काय होते, याची चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यांनी कराळे एका कार्यक्रमात खरातसोबत उपस्थित असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत विविध मुद्द्यांवर चौकशीची मागणी केली आहे.
तसेच खरातच्या नाशिक, ओझर, अहिल्यानगर आणि शिर्डी येथील मालमत्तांची तपासणी ईडीकडून सुरू आहे.
दरम्यान, नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित कॉर्पोरेट सेक्स स्कँडल प्रकरणातही तपास वेगाने सुरू आहे. संशयित आरोपींच्या बँक खात्यांची तपासणी करण्यात येत असून त्यांना देश-विदेशातून आर्थिक मदत मिळत होती का, याचा तपास केला जात आहे.
विशेष पोलीस पथकाकडून संशयितांच्या ईमेल, चॅट आणि कॉल रेकॉर्ड्सची तपासणी सुरू असून, मानसिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुण-तरुणींना लक्ष्य करून त्यांचे शोषण केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच कंपनीच्या कामाच्या वेळेनंतर संशयास्पद हालचाली होत असल्याचाही तपास सुरू आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0