सुधार समिती अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी यांची बिनविरोध निवड

बृहन्मुंबई महानगरपालिका सुधार समितीच्या अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी यांची बिनविरोध निवड; महापौर रितू तावडे यांनी घोषणा केली.

Apr 4, 2026 - 03:35
Apr 5, 2026 - 03:35
 0  13
सुधार समिती अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी यांची बिनविरोध निवड
सुधार समिती अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी

बृहन्मुंबई महानगरपालिका सुधार समितीच्या अध्यक्षपदी श्रीमती संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली असून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी अधिकृत घोषणा केली.

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ नंतर सुधार समितीची रचना करण्यात आली होती. सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या विशेष सभेत २६ सदस्यांची या वैधानिक समितीवर नियुक्ती करण्यात आली होती.

सुधार समिती अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज श्रीमती संध्या विपुल दोशी (सक्रे) यांचा प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. यानुसार आज आयोजित विशेष सभेत त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

या बैठकीला सुधार समितीचे सदस्य, सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे, महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0