चर्मकार समाजासाठी सुवर्णसंधी; ५० टक्के अनुदान व बीजभांडवल योजनांसाठी अर्ज आमंत्रित
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील युवक व महिलांसाठी ५० टक्के अनुदान आणि बीजभांडवल योजनांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६ लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
गडचिरोली : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील युवक आणि महिलांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विविध स्वयंरोजगार योजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत ५० टक्के अनुदान योजना तसेच बीजभांडवल योजनांसाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत ५० टक्के अनुदान योजनेत ९ लाभार्थी तर बीजभांडवल योजनेंतर्गत ७ लाभार्थी अशा एकूण १६ लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या योजनांमुळे युवक आणि महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, मोची आणि होलार) असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असावे. तसेच अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थ्याने स्वतः व्यवसाय करणे बंधनकारक राहणार आहे.
अर्जासोबत जात प्रमाणपत्र, चालू वर्षाचा उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, उद्योग आधार, सिबिल स्कोअर, व्यवसायाच्या जागेचा पुरावा तसेच बँक पासबुकची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या तीन प्रती जिल्हा कार्यालय, गडचिरोली, आयटीआयच्या पाठीमागे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, चंद्रपूर रोड, गडचिरोली येथे सादर कराव्यात.
अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच जास्तीत जास्त समाज बांधवांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. टी. जिभकाटे यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
