मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोटारसायकलवरून विधान भवनात; दिला इंधन बचत आणि ऊर्जा संवर्धनाचा संदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन बचत आणि ऊर्जा संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानापासून विधान भवनापर्यंत मोटारसायकलवरून प्रवास केला. यावेळी मंत्री आशिष शेलारही त्यांच्यासोबत उपस्थित होते.

May 14, 2026 - 20:52
 0  4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोटारसायकलवरून विधान भवनात; दिला इंधन बचत आणि ऊर्जा संवर्धनाचा संदेश
देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, ऊर्जा संवर्धन, इंधन बचत, विधान भवन मुंबई, मुख्यमंत्री

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

देवेंद्र फडणवीस यांनी इंधन बचत आणि ऊर्जा संवर्धनाचा संदेश देण्यासाठी गुरुवारी वेगळ्या पद्धतीने जनजागृती केली. मुख्यमंत्री आपल्या शासकीय वर्षा निवासस्थानापासून विधान भवन येथे मोटारसायकलवरून पोहोचले.

यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री विधान भवनात आले होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रवासाचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करताना सांगितले की, पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रासाठी मितव्ययिता आणि ऊर्जा बचतीच्या दिशेने हे त्यांचे छोटे योगदान आहे.

तसेच त्यांनी नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनशैलीत शक्य त्या पद्धतीने बदल करून इंधन बचत आणि ऊर्जा संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्र्यांच्या या उपक्रमाचे पर्यावरण संवर्धन आणि संसाधनांच्या जबाबदारीने वापराचा संदेश म्हणून स्वागत केले जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0