मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘मुंबई क्लायमेट वीक 2026 इम्पॅक्ट रिपोर्ट’चे प्रकाशन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘मुंबई क्लायमेट वीक 2026 इम्पॅक्ट रिपोर्ट’चे प्रकाशन केले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

May 15, 2026 - 17:21
 0  4
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘मुंबई क्लायमेट वीक 2026 इम्पॅक्ट रिपोर्ट’चे प्रकाशन
देवेंद्र फडणवीस, मुंबई क्लायमेट वीक 2026, इम्पॅक्ट रिपोर्ट, एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार, मंत्रालय मुंबई, हवामान बदल, महाराष्ट्र सरकार, Climate Week Mumbai,

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ‘मुंबई क्लायमेट वीक 2026 इम्पॅक्ट रिपोर्ट’चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होते.

मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी हवामान बदल, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने ‘मुंबई क्लायमेट वीक 2026’ उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमांतर्गत विविध स्तरांवर राबविण्यात आलेल्या कामांचा आणि परिणामांचा आढावा या इम्पॅक्ट रिपोर्टमध्ये घेण्यात आला आहे.

कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील इतर सदस्य, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्य सरकारकडून पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी सामना करण्यासाठी प्रभावी धोरणे आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0