मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आमदार अमित गोरखे यांच्या हस्तक्षेपाचे डी. डी. गायकवाड यांच्याकडून कौतुक
मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार अमित गोरखे यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल राष्ट्रीय निवारा परिषद संघटनेचे प्रमुख डी. डी. गायकवाड यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील प्रकरणांवर तातडीने दखल घेतल्याबद्दल त्यांनी आमदार गोरखे यांचे आभार मानले.
मुंबई प्रतिनिधी : मातंग समाजातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हस्तक्षेप केल्याबद्दल राष्ट्रीय निवारा परिषद संघटनेचे प्रमुख मा. डी. डी. गायकवाड यांनी महाराष्ट्र विधानसभेचे आमदार अमित गोरखे यांचे विशेष आभार मानले आहेत.
डी. डी. गायकवाड यांनी आमदार अमित गोरखे यांना पाठवलेल्या कृतज्ञता पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील मातंग समाज आर्थिकदृष्ट्या संघर्षमय परिस्थितीत जीवन जगत असून, समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी राज्य शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. या निर्णयामुळे समाजातील अनेक विद्यार्थी देशात आणि परदेशात उच्च शिक्षण घेत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.
मात्र, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील काही अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणांमुळे अनेक विद्यार्थ्यांची प्रकरणे प्रलंबित राहिली होती. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. या प्रश्नांवर न्याय मिळावा यासाठी त्यांनी १४ एप्रिल २०२६ रोजी ‘आत्मबलिदान आंदोलन’ करण्याचा इशारा दिला होता.
यानंतर आमदार अमित गोरखे यांनी या विषयाची गंभीर दखल घेत प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल गायकवाड यांनी त्यांचे कौतुक केले.
आपल्यासारख्या तरुण आणि अभ्यासू नेतृत्वामुळे समाजातील शेवटच्या घटकातही न्यायाची अपेक्षा निर्माण झाली असल्याचे गायकवाड यांनी पत्रात म्हटले आहे. भविष्यातही समाजहितासाठी आमदार अमित गोरखे यांचे सहकार्य लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय निवारा परिषद आणि मातंग समाजाच्या वतीने आमदार अमित गोरखे यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0