ऑलिंपिक सप्ताहानिमित्त जिल्हा तलवारबाजी अजिंक्य स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; शरयू पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
ऑलिंपिक सप्ताहानिमित्त कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा संस्कृती फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा तलवारबाजी अजिंक्य स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शरयू पाटील यांच्या हस्ते झाले.
नाशिक | प्रतिनिधी : ऑलिंपिक सप्ताहानिमित्त कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायाम शाळा, क्रीडा संस्कृती फाउंडेशन आणि दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा तलवारबाजी अजिंक्य स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. २३ ते ३० जूनदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत २८ जून रोजी या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कु. शरयू पाटील यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र थ्रो बॉल संघटनेचे सरचिटणीस राहुल वाघमारे होते. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे, तलवारबाजी राज्य संघटनेचे सहसचिव अविनाश दुधाने, शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजू शिंदे तसेच स्पर्धा समन्वयक अविनाश ढोली प्रमुख उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना शरयू पाटील यांनी अशा स्पर्धांमधूनच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी खेळाडूंना तयारी करता येते, असे सांगितले. खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा पूर्ण लाभ घेत सातत्याने मेहनत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन राहुल पडवळ यांनी केले, तर प्रसाद परदेशी यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल
ईपी (मुले)
प्रथम : विराल मस्के
द्वितीय : आदित्य बनगर
तृतीय : अर्णव बनगर, विराज गोसावी
फॉइल (मुले)
प्रथम : प्रणव डेरले
द्वितीय : चिरायू पाटील
तृतीय : रियांश कराड, साहिल कांदळकर
सॅबर (मुले)
प्रथम : परदेशी
द्वितीय : आदित्य पाटील
तृतीय : संकेत पाटील, कार्तिक वराडे
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0