दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात अभिवादन; मान्यवरांकडून जयंतीनिमित्त आदरांजली
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुंबई | प्रतिनिधी : देवानंद शिंदे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी भावपूर्ण अभिवादन केले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे, आमदार जयंत आसगावकर, आमदार शिवाजीराव गर्जे, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तसेच सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड तसेच मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनीही दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, प्रशासनातील कार्यतत्परता आणि जनसामान्यांप्रती असलेली बांधिलकी यांचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. मंत्रालय परिसरात श्रद्धापूर्ण वातावरणात हा अभिवादन कार्यक्रम पार पडला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1