चीज अॅनालॉगबाबत अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश; ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी कारवाईचा इशारा
राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांकडून चीज अॅनालॉगचा वाढता वापर लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी मेन्यू कार्ड आणि डिस्प्ले बोर्डवर स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
कोल्हापूर : राज्यातील काही रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांकडून चीज अॅनालॉग या अन्न पदार्थाचा वाढता वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित व्हावी, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
चीज अॅनालॉग म्हणजे काय?
चीज अॅनालॉग हा अन्न पदार्थ दुधाऐवजी स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटकांचा वापर करून तयार केला जातो. दिसायला तो पनीर किंवा चीजसारखा असला तरी तो प्रत्यक्षात पनीर किंवा चीज मानला जात नाही.
विक्रेत्यांना स्पष्ट उल्लेख बंधनकारक
रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्स किंवा फास्ट फूड विक्रेते जर पनीरऐवजी चीज अॅनालॉगचा वापर करून पदार्थ तयार करत असतील, तर त्याबाबत मेन्यू कार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड किंवा इतर ठिकाणी स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
ग्राहकांनी पनीर किंवा चीज खरेदी करताना पॅकबंद उत्पादनावरील लेबल काळजीपूर्वक वाचावे. त्यावर ‘अॅनालॉग’ असा उल्लेख आहे का, हे तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन कटिबद्ध असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांनी स्पष्ट के
ले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0