गडचिरोलीत ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
गडचिरोली जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नऊ परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
गडचिरोली, दि. १३ :
जिल्हा परिषद गडचिरोलीच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृह येथे आयोजित करण्यात आलेला ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नऊ परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रफुल्ल हुलके तसेच जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. पंकज हेमके प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये परिचारिकांचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी परिचारिका या आरोग्य व्यवस्थेचा कणा असल्याचे सांगितले. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी “जनतेच्या आरोग्याची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या,” असे आवाहन परिचारिकांना केले.
फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार विजेते
१. आरोग्य सेविका श्रेणी
प्रथम : अर्चना मुऱ्हावी मडावी (प्राथमिक आरोग्य केंद्र, पुराडा)
द्वितीय : रजनी कांचनलाल वासनिक (प्राथमिक आरोग्य केंद्र, निर्मलगट्टा)
तृतीय : वैशाली भीवारी झाडे (प्राथमिक आरोग्य केंद्र, निर्मलगट्टा)
२. आरोग्य सहाय्यिका श्रेणी
प्रथम : शोभा अरुण गेडाम (प्राथमिक आरोग्य केंद्र, मालेवाडा)
द्वितीय : छाया नरेश गरभिये (प्राथमिक आरोग्य केंद्र, कोटगुल)
तृतीय : विद्या हनुमंतराव उईके (प्राथमिक आरोग्य केंद्र, पुराडा)
३. परिचारिका / अधिपरिचारिका श्रेणी
प्रथम : नजमा शाहिद बेग (ग्रामीण रुग्णालय, भामरागड)
द्वितीय : नंदा मनोहर चालको (जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली)
तृतीय : सुनंदा रमेश चांदेकर (उपजिल्हा रुग्णालय, अहेरी)
विशेष सन्मान
फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कारांव्यतिरिक्त एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम (IDSP) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य सेविका, सेवक आणि फार्मासिस्ट यांचाही गौरव करण्यात आला.
तसेच मुंबई येथे आयोजित DHPE प्रशिक्षणामध्ये जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या श्रीमती स्मिता लोणारे आणि श्रीमती मीना राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0