घाटकोपरमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्त जयंती उत्सव जल्लोषात; महापौर रितू तावडे यांची उपस्थिती

घाटकोपर येथे बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्त जयंती समिती, एन विभागाच्या वतीने संयुक्त जयंती उत्सव 2026 उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

May 2, 2026 - 01:38
 0  6
घाटकोपरमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्त जयंती उत्सव जल्लोषात; महापौर रितू तावडे यांची उपस्थिती
संयुक्त जयंती उत्सव, BMC एन विभाग,

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

मुंबई, दि. — घाटकोपर येथे बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्त जयंती समिती, एन विभागाच्या वतीने संयुक्त जयंती उत्सव 2026 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. समितीचे वर्ष 24 अध्यक्ष विक्रम मोटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच संतोष धोंडे (उपायुक्त, परिमंडळ 6), अश्विनी मते (प्रभाग समिती), रमेश जाधव (कामगार नेते), वीणा सोनावणे (प्रशासकीय अधिकारी) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय बबन सरोदे, नितीन पाटील, सुभाष नवले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

प्रबोधनात्मक मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमादरम्यान शिरीष पवार यांच्या प्रबोधनात्मक मनोरंजन कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कर्मचाऱ्यांच्या मुलांचा विशेष सन्मान

महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मुलांना संविधानाची प्रस्तावना देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

मोठ्या संख्येने कामगार वर्गाची उपस्थिती

या कार्यक्रमाला एन विभागातील कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0