नौदल प्रमुख पदी नियुक्तीबद्दल व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांचे राज्यपालांकडून अभिनंदन
भारतीय नौदलाच्या प्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांनी मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन करून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुंबई | प्रतिनिधी
भारतीय नौदलाच्या प्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर भारतीय नौदलाच्या पश्चिम कमानचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी आज मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारतीय नौदलात दीर्घ अनुभव असलेल्या कृष्णा स्वामिनाथन यांच्या नियुक्तीमुळे देशाच्या सागरी सुरक्षेला अधिक बळ मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
