मुंबईकरांच्या आरोग्यसेवांना गती; हरिष भांदिर्गे यांच्या उपस्थितीत प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठातांची बैठक

मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतील आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी अधिष्ठातांची बैठक घेतली. मोफत उपचार योजना, औषध साठा, वैद्यकीय उपकरणे आणि रुग्ण सुविधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

May 14, 2026 - 19:21
 0  4
मुंबईकरांच्या आरोग्यसेवांना गती; हरिष भांदिर्गे यांच्या उपस्थितीत प्रमुख रुग्णालयांच्या अधिष्ठातांची बैठक
हरिष भांदिर्गे, मुंबई महानगरपालिका, आरोग्य समिती, केईएम रुग्णालय,

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई, दि. १३ मे २०२६ : मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांतील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुलभ आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. आरोग्य समिती कार्यालयात झालेल्या या बैठकीत महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीला सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे, नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माला दीक्षित, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरिष पाठक, नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे तसेच सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे उपस्थित होते.

बैठकीत मुंबईकरांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला. मोफत उपचार योजना, रुग्णालयांतील सुविधा, औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी सांगितले की, सर्वसामान्य नागरिकांना विनाखर्च दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हेच महानगरपालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. रुग्णालयांमध्ये सेवा अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी डॅशबोर्ड प्रणाली सुरू करण्याबाबतही चर्चा झाली.

तसेच “झिरो प्रिस्क्रिप्शन” उपक्रम प्रभावीपणे राबविणे, आवश्यक वैद्यकीय मशिनरी उपलब्ध करून देणे, सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि डॉक्टर-नर्सेस यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

मुंबईतील प्रत्येक गरजूंना अधिक चांगल्या, सुलभ आणि परिणामकारक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे हरिष भांदिर्गे यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0