इस्रायलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी; पात्र उमेदवारांना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन
मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत इस्रायल येथे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. काळजीवाहू आणि आरोग्य सेवेशी संबंधित प्रशिक्षण घेतलेल्या २५ ते ४५ वयोगटातील पात्र उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई, दि. ७ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरमार्फत इस्रायल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतची माहिती मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त शैलेश भगत यांनी दिली.
या भरती प्रक्रियेसाठी इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असलेले २५ ते ४५ वयोगटातील उमेदवार पात्र ठरणार आहेत. उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी आवश्यक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त नियामक प्राधिकरणाकडून प्रमाणित किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेला असावा. तसेच नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट किंवा मिडवायफरीमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.
जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग किंवा पोस्ट बीएससी नर्सिंग अशी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या रोजगार संधीसाठी अर्ज करू शकतात.
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती, लाभ आणि नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शैलेश भगत यांनी केले आहे.
नोंदणीसाठी संकेतस्थळ:
महाराष्ट्र इंटरनॅशनल अधिकृत संकेतस्थळ�
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
2
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1