खामगाव नगर परिषदेच्या घंटागाड्या ठरतायत आरोग्यासाठी धोकादायक

खामगावमध्ये कचरा संकलनाच्या घंटागाड्यांची दुरवस्था; कचरा रस्त्यावर, नागरिकांच्या आरोग्यावर धोका.

Apr 11, 2026 - 03:43
 0  2
खामगाव नगर परिषदेच्या घंटागाड्या ठरतायत आरोग्यासाठी धोकादायक
खामगाव, कचरा व्यवस्थापन, घंटागाडी

बुलडाणा ब्यूरो - अमोल सराफ 

खामगाव नगर परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कचरा संकलनासाठीच्या घंटागाड्या आता नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे.

ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा करण्यासाठी या गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या या गाड्यांची दुरवस्था झाल्याने कचरा गाड्यांबाहेर पडत असून रस्त्यांवर विखुरलेला दिसत आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्याची योग्य व्यवस्था नसल्याने संपूर्ण कचरा एकत्र मिसळला जात आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाच्या उद्देशालाच तडा जात असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून नगर परिषदेकडे तक्रारींचा भडिमार होत आहे. घंटागाड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून द्यावेत आणि व्यवस्थापन अधिक प्रभावी करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष न दिल्यास भविष्यात मोठे आरोग्य संकट निर्माण होऊ शकते, अशीही भीती व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0