कोल्हापूर लोकशाही दिनात 86 तक्रार अर्ज दाखल; प्रलंबित प्रकरणांवर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात 86 नवीन तक्रार अर्ज प्राप्त झाले. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व अर्जांचे विहित मुदतीत निराकरण करण्याचे निर्देश दिले असून दीर्घकाळ प्रलंबित अर्ज असलेल्या विभागांना कारणे दाखवा नोटीस देण्याचा इशारा दिला.

Jun 2, 2026 - 20:10
 0  3
कोल्हापूर लोकशाही दिनात 86 तक्रार अर्ज दाखल; प्रलंबित प्रकरणांवर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा
कोल्हापूर लोकशाही दिन, लोकशाही दिन 2026,

कोल्हापूर, दि. 2 जून : कोल्हापूर जिल्ह्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा 'लोकशाही दिन' यावेळी मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या लोकशाही दिनात नागरिकांकडून विविध विषयांवरील 86 नवीन तक्रार अर्ज प्राप्त झाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे विहित कालावधीत निराकरण करण्याचे निर्देश संबंधित प्रशासकीय विभागांना दिले. तसेच विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या अर्जांचा सविस्तर आढावा घेत नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यावर भर दिला.

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या अर्जांबाबत गंभीर भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अशा विभागांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच लोकशाही दिनासाठी सर्व शासकीय कार्यालये आणि विभागांनी अनिवार्यपणे उपस्थित राहण्याचे निर्देश देत गैरहजर राहणाऱ्या विभागांवरही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींना न्याय देण्याबरोबरच प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.