महात्मा फुले वाड्यातून आलेल्या क्रांतीज्योतचे बुलढाण्यात जल्लोषात स्वागत

महात्मा फुले जयंतीनिमित्त पुण्यातील फुले वाड्यातून आणलेल्या क्रांतीज्योतचे बुलढाण्यात उत्साहात स्वागत.

Apr 10, 2026 - 17:31
 0  4
महात्मा फुले वाड्यातून आलेल्या क्रांतीज्योतचे बुलढाण्यात जल्लोषात स्वागत
महात्मा फुले जयंती

बुलढाणा, विदर्भ ब्युरो अमोल सराफ

बुलढाणा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून मागील तीन वर्षांपासून महात्मा फुले वाडा येथून माती आणि क्रांतीज्योत बुलढाण्यात आणण्याची परंपरा जपली जात आहे. यावर्षीही पुण्यातून दोन दिवसांचा प्रवास करून क्रांतीज्योत बुलढाणा शहरात दाखल झाली.

धाड नाका परिसरापासून या क्रांतीज्योतीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली आणि महात्मा फुले शाळा येथे मशाल यात्रेचा समारोप करण्यात आला.

क्रांतीज्योत घेऊन येणाऱ्या पथकात आशिष लहासे, वैभव इंगळे, कृष्णकांत बगाडे, निलेश पाटील, वैभव लाड आणि प्रदीप डांगे यांचा समावेश होता.

या उपक्रमामुळे महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर आणि समाजप्रबोधनाचा संदेश मोठ्या प्रमाणावर पोहोचत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0