लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन; देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधीवत पूजन व आरती केली. तसेच तीर्थराज कुशावर्त येथे पूजा करून देशाच्या प्रगती, समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.
नाशिक | ब्यूरो
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नाशिक जिल्ह्यातील पवित्र श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे विधीवत पूजन करून महाआरती केली तसेच देशाच्या प्रगती, समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.
दर्शनावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, तहसीलदार गणेश जाधव, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, मंदिर संस्थानचे विश्वस्त कैलास घुले व रुपाली भुतडा, तसेच त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पवित्र तीर्थराज कुशावर्त येथेही विधीवत पूजा करून धार्मिक परंपरेनुसार दर्शन घेतले. त्यांच्या दौऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0