राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नवी दिल्ली, दि. १ मे : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उभय महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कस्तुरबा गांधी मार्गस्थित तसेच कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीतासह राज्य गीताचे सामूहिक गायन करून महाराष्ट्र दिन साजरा केला.
कार्यक्रमास विशेष आयुक्त श्वेता सिंघल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, निवासी अभियंता आशुतोष दिवेदी, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार, महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सदनातील निवासी अभ्यागत तसेच दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
राजधानीत महाराष्ट्र दिनानिमित्त उत्साहपूर्ण आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

